हरणघाट मार्गे गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारूची वाहतूक! पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष?

454

 

सावली तालुक्यातील हरणघाट मार्गाचा वापर करून चोरट्या पध्द्तीने अवैध देशी सह विदेशी दारूची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र दिसत आहे.मात्र या कडे सावली व मूल पोलिसांचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा प्रकार या निमित्ताने उजेडात आले आहे.

गडचिरोली जिल्यात दारू बंद असल्याने अनेक जण गडचिरोली च्या राष्ट्रीय मुख्य मार्गाचा वापर करणे टाळून चोरट्या मार्गाने पुरवठा करीत आहे.दुचाकी वाहना सह चार चाकीने वाहतुकीची प्रकार सर्वात जास्त आहे. सदर वाहतूक सुरू असतांना ही गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील नदी जवळील नाका हा कुचकामी ठरला आहे. मात्र अवैध दारू पुरवठा करणाऱ्यांना अभय कुणाचे आहे असा प्रश्न निर्माण झालेले आहे.गडचिरोली जिल्ह्यात अवैध वाहतूक होणारी दारू ही मूल व सावली तालुक्यातून होत असल्याची माहिती पुढे येत आहे.

मात्र अबकारी विभाग चंद्रपूर,पोलीस उपविभागीय मूल व सावली-मूल पोलिस यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेक जण आश्चर्य व्यक्त करीत आहे.मात्र याकडे प्रकाराकडे तत्परतेने पोलीस अधीक्षक लक्ष देतील काय?असा प्रश्न या परिसरातील सामान्य जनता विचारत आहे.