2 लाखाची मिळालेली पर्स सावली च्या प्रामाणिक महिलांनी केले परत…महिलांचे सर्वत्र होतेय अभिनंदन

3316

एस न्यूज नेटवर्क /सावली / सूरज बोम्मावार 

सावली येथील सौ. किर्ती योगेश्वर शेंडे व सौ. कुंदा जगदीश लेनगुरे या दोघेजण मूल बसस्थानकावर सावली च्या बस ची वाट पाहत असतांना त्यांना एक पर्स मिळाली.पर्स कुणाची आहे म्हणून चार चौघांना विचारणा केली मात्र सावली ची बस लागल्याने या दोघेजण हे गावाकडे परत येत असतांना त्यांनी पर्स उघडली तर त्यात 3 तोळे सोने,मोबाईल व 3500 हजार दिसले.आणि त्यांना धक्का बसला.त्यामुळे या दोन्ही महिलांनी बस मधूनच फोन वर शांतता कमिटीचे सदस्य तथा माजी सरपंच अतुल लेनगुरे यांना माहिती दिली.व घडलेला प्रसंग सांगितले.

त्यानंतर अतुल लेनगुरे यांनी सावली चे ठाणेदार राजगुरू यांना माहिती दिली व कुणाची असेल किव्हा तक्रार आल्यास त्वरित कळवा असे सांगितले. त्यानंतर 15 मिनिटातच मूल पोलीसात पर्स हरविल्याची माहिती आली आणि त्यांनी त्वरित सावली ला आले.वस्तूची ओळख परेड झाल्यावर ती पर्स व वस्तू
सौ सोनाली गणेश जम्पलवार मु. भेंडाळा ता.चामोर्शी जिल्हा गडचिरोली यांची असल्याचे निष्पन्न झाले.त्यात 3 तोळे सोना ,मोबाईल, 3500 रु असा एकूण दोन लाखाहून अधिकचा माल परत करण्यात आले.यावेळी जंपलवार यांनी या दोन्ही महिलांचे आभार मानले.तसेच त्यांच्या प्रामाणिक कार्याचे कौतुक केले.सावली चे ठाणेदार राजगुरु यांनी या दोन्ही महिलांच्या प्रामाणिक कार्याचे कौतुक केले.व अभिनंदन केले.