रविवारी एका प्रेसला संबोधित करताना विजय वडेट्टीवार यांनी मुंबई येथील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात हेमंत करकरे यांचा मृत्यू कसाबच्या गोळीने झाला नसून पोलीस दलातील एका अधिकाऱ्याच्या गोळीने झाला असे बेताल वक्तव्य केले. आतंकवाद्याला पाठीशी घालून पोलीस विभागावर आरोप करत बेताल वक्तव्यामुळे व कसाब सारख्या आतंकवाद्याला ज्यांनी फासावर पोहचवल अशा ऍड. उज्वल निकम साहेबांना देशद्रोही म्हणणाऱ्या वडेट्टीवारांचा निषेध नोंदविण्यासाठी सावली येथे भारतीय जनता पार्टी सावलीच्या वतीने निदर्शने करण्यात आले. सोबतच सावली पोलीस स्टेशनला जाऊन वडेट्टीवार यांच्याविरुद्ध एफ आय आर दाखल करण्याकरिता निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित भाजप तालुका अध्यक्ष अविनाश पाल, तालुका महामंत्री तथा नगरसेवक सतीश बोमावार, जिल्हा महिला महामंत्री नीलम सुरमवार, ज्येष्ठ नेते दौलत भोपये, माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष तंगड्डपल्लिवार, भाजप शहराध्यक्ष आशिष कार्लेकर, अर्जुन भोयर कोषाध्यक्ष, दिलिप जाधव,शरद सोनवाने, निखिल सुरमवार, राहुल लोडेलीवार, प्रकाश खंजाची, विशाल आर के , राकेश विरमलवार, अरून पाल, विनोद गड्डमवार, नगरसेविका शारदा गुरनुले,दीलिप आभारे, अनिल माचेवार,अंबादास गुरुनुले आदी भाजपा कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते








