सावली(सूरज बोम्मावार)
सद्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात नवीन घरकुल तसेच इतर बांधकाम ची कामे मंजूर आहेत तर अनेक ठिकाणची कामे ही रेती च्या अभावाने बंद आहेत.सावली तालुक्यात तर शेकडो घरकुल मंजूर आहे.मात्र रेतीच मिळत नाही आणि मिळाली तर अवाच्या सव्वा भाव लावत असल्याने शेकडो घरकुल ची कामे बंद आहेत.
सद्या सावली तालुक्यातील एकही रेती घाट हे लिलावात नाही. त्यामुळे काही ठिकाणी रेती नदी पात्रातून आणत असताना महसूल विभाग व पोलीस विभाग हे रेती चे ट्रॅक्टर पकडून कारवाई करीत आहेत गुन्हे दाखल करीत आहे.एक दोन ट्रिप मारणारे लाखो रुपयांचे दंड भरत आहे.ही त्यांची शासकीय कारवाई आहे यात काहीच हरकत नाही मात्र महसूल व पोलीस विभागाची कारवाई ही गेल्या काही दिवसापासून दुपट्टी वाटत आहे.रेतीच्या ट्रॅक्टर वर बंदी आहे म्हणून कारवाई मग राजरोस पणे हायवा ट्रक ने रेती टाकणारे हे मोकळीक कसे असा प्रश्न निर्माण होत आहे.आजही सावली तालुक्यात शहरासह अनेक ठिकाणी हायवा ने रेती टाकल्या जात आहे मग त्यांच्या वर कारवाई कोण करणार?त्यांच्या वर कारवाई करण्यासाठी हेच ट्रॅक्टर वर कारवाई करणारे अधिकारी आपले हात का बांधून आहे.मोठ्या प्रमाणात हायवा ने टीपी असल्याचे बतावणी करून रेती टाकली जातात मग ज्यांच्या कडे रेती टाकली जाते त्यांच्या कडे ही टीपी ची पावती आहे का? कुणाकडेही नसतांना फक्त राजकिय दबावातून जर आपले काही जण आपले धंदे सुरू ठेवत असेल आणि त्याला अधिकारी डोक्यावर हात ठेवत असेल तर हा प्रकार योग्य नाही याचा संबधीत विभागाचा अधिकाऱ्यांनी विचार करावा.
जनतेच्या मागण्या आहे की घरकुल साठी रेती नाही त्यामुळे त्यांना त्वरित उपाय योजना करून रेती बांधकाम साठी उपलब्ध करावी अशी मागणी शेकडो घरकुल धारकांनी केली आहे.








