एस न्यूज नेटवर्क /सावली /सौरव गोहने
राष्ट्रपिता महात्मा गांधी कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग , नगरपंचायत सावली, व तहसील कार्यालय सावली च्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले. सावली येथील बाजार चौकात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी पथनाट्यद्वारे मतदार जनजागृती केली.

‘चला मतदान करू या’, ‘सुदृढ लोकशाहीसाठी माझं मत’ या पथनाट्यानी नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक खोब्रागडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून नगरपंचायत सावलीचे कनिष्ठ अभियंता प्रणाली दुधबळे, समीर सहारे तहसील कार्यालयातील कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. रामचंद्र वासेकर सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. स्मिता राऊत, महाविद्यालयातील गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वय प्रा. संदीप देशमुख , वाणिज्य विभाग प्रमुख प्राध्यापक विनोद बडवाई यांनी परिश्रम घेतले. मतदार जनजागृती अभियान अंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले यात विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.








