शेतकरी उत्पादन कंपन्यांचे राज्याबाहेर दौरा यशस्वी…

579

 

एस न्यूज नेटवर्क :- 

मा बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प अंतर्गत मा. प्रकल्प संचालक, (आत्मा) तथा प्रमुख, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, स्मार्ट श्रीमती प्रीती हिरळकर यांचे मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्ह्यातील कृषकोन्नती कृषी विकास, चांदागढ, राणी हिराई, चंद्रपूर गडचिरोली, नास, व्याहाड या 6 शेतकरी उत्पादक कंपन्याचे स्मार्ट प्रकल्प अंतर्गत राज्याबाहेर अभ्यासदौरा दिनांक 7 ते 13 मार्च दरम्यान दिल्ली- गाझीयाबाद – बुलंदशहर येथे पार पडला, या 7 दिवसात वरील शेतकरी उत्पादक कंपन्यानी विविध प्रक्रिया उद्योग, प्रगतीशील शेतकरी, कृषी संशोधन संस्था या ठिकाणी भेट देऊन माहिती घेतली.

पहिला दिवस प्रवासाने सुरुवात
*दुसरा दिवस* – सकाळच्या सत्रात IARI, Pusa येथे Green House, Shednet House, Protected Cultivation यांस भेट, पाहणी व चर्चा
दुपारच्या सत्रात Biomass Management Unit येथे विविध पिकाच्या पालापाचोळा पासून खत निर्मिती प्रकल्पास भेट, पाहणी व चर्चा
तसेच 1 हेक्टर वर एकात्मिक शेती पद्धतीचे Model विकसित करणे – भेट, पाहणी व चर्चा

*तिसरा दिवस* – बुलंदशहर येथे प्रगतीशील शेतकरी पद्मश्री भारत भूषण त्यागी यांचे प्रक्षेत्रास भेट…
सकाळच्या सत्रात नैसर्गिक व जैविक शेती कशी करावी व शेतकरी उत्पादक कंपनी यांचे जबाबदारी यावर प्रशिक्षण व मार्गदर्शन व शेतीची पाहणी

दुपारच्या सत्रात समक बायो एनर्जी शेतकरी उत्पादक कंपनी यांचे Seed Processing व Cleaning Grading Unit ला भेट व चर्चा

*चौथा दिवस* – शेतकरी उत्पादक कंपनी यांचेसाठी दिल्ली दर्शन

*पाचवा दिवस -*
सकाळच्या सत्रात – National Centre for Organic and Natural Farming (NCONF) गाझियाबाद येथे जैविक व नैसर्गिक शेती विषयी प्रशिक्षण घेण्यात आले.

दुपारच्या सत्रात – NCONF परिसरात असलेल्या नैसर्गिक व जैविक शेतीची Model पाहण्यात आली, क्षेत्रीय भेट व चर्चा करण्यात आली.

*सहावा दिवस* National Seed Corporation NSC मुख्यालय येथे बियाणे प्रकल्पास भेट व चर्चा

नंतर IARI अंतर्गत असलेल्या Seed Processing Plant ला भेट व बियाणे स्वछता पासून ते Packing पर्यंत होत असलेल्या प्रक्रियेची माहिती घेतली.