
सावली तालुका कलार समाजाच्या वतीने दिनांक 10 मार्च ला उपवधू- वर परिचय, समाज भूषण पुरस्कार, उच्च शिक्षिताचा सत्कार, वयोवृध्द नागरिक,व समाज मेळावा चे यशस्वी आयोजन व्याहाड खुर्द येथे देवराव मंगल कार्यालयात पार पडले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार अविनाश वारजुरकर होते तर उद्घाटक म्हणून माजी जीप अध्यक्ष प्रकाश पाटिल मारकवार होते. विशेष अतिथी चीत्राताई डांगे माजी. जि. प. सदस्य, चंदू पाटिल मांरकवार, माजी सरपंच, विनोद अहिरकर मा. जीप सदस्य, दिनेश चिटनुरवार मां. बांध. सभापती चंद्रपूर, राजू मांरकवार, दिलीप गडपल्लीवार, निरंजन पा. वासेकर, अनंत पा.चिटनुरवार, दामोधर मंडलवार कलार समाज जिल्हा अध्यक्ष, राधाकिसन जी येगलोपवार चामोर्शी, प्रशांत चिटनुलवार,नर्सिंग गणवेनवार सामजिक कार्यकर्ते, रवि वासेकर गडचिरोली, तुकारामजी बोमनवार, किशोर गडपल्लीवार, गणेश पुल्लुरवार,सुनिल चडगुलवार, तालुका अध्यक्ष श्रीनिवास पुल्लुरवार मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी सावली येथील प्रसिध्द डॉ. विजय शेंडे, नागपूर येथील कॅन्सर तज्ञ डॉ.नितीन बोमनवार यांना समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.तर डॉ.कु.साईली रवींद्र बोमनवार हिला उच्च शिक्षण बद्दल सत्कार करण्यात आला.तसेच समाजातील इतर गुणवंताचा सत्कार करण्यात आला.या मेळावा मध्ये उपवर व वधू यांनी परिचय ही दिले.यावेळी मोठ्या संख्येने कलार समाज बांधव व भगिनी उपस्थित होते.
- या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. पवण कवठे यानी केले तर आभार प्रदर्शन उमेश गोलेपल्लीवार यानी केले.