13 वर्षीय मूली सोबत आईची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

2380

 

सावली तालुक्यातील खेडी येथील 13 वर्षीय मूली सोबत आईची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपार च्या सुमारास घडली.

वृत्त असे की तालुक्यातील खेडी येथील शेतशिवारातील विहिरीत महिलेची 13 वर्षीय मुलीसह आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेची माहिती गावात पसरताच गावात एकच खळबळ उडाली असून दर्शना दीपक पेटकर (35 ) असे महिलेचे नाव असून समीक्षा दीपक पेटकर (मुलगी 13 ) असे मृतकाचे नावे आहे. सदर मृतक हे मुल येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आई व मुलीला ग्रामीण रुग्णालय सावली दाखल केले असता डॉक्टरांनी मृत्यु घोषित केले असून आत्महत्येचे कारण अजुन ही अस्पष्ट आहे. या घटनेची पुढील तपास सावली पोलीस करित आहे.