सामाजिक वनीकरण विभागांतर्गत राष्ट्रीय हरित सेना शाळेतील विद्यार्थ्यांची निसर्ग भ्रमंती व वनभ्रमंती व निसर्ग शिबिराचे आयोजन

245

 

सावली(ता.प्रा.)
आज दिनांक 24/२/2024 ला सामाजिक वनीकरण विभागांतर्गत राष्ट्रीय हरित सेना शाळेतील विद्यार्थ्यांची निसर्ग भ्रमंती व वनभ्रमंती व निसर्ग शिबिर यांचे आयोजन करण्यात आला यामध्ये स्वर्गीय बापूजी पाटील हायस्कूल राजगड ,नवभारत विद्यालय विद्यालय मूल, देवनील विद्यालय टेकाडी, शरदचंद्र विद्यालय भेजगाव, डॉ.आंबेडकर विद्यालय गडीसूरला ,महात्मा फुले विद्यालय चिरोली. आनंद विद्यालय खेडझर, तसेच विश्वशांती विद्यालय मारोडा येथील साधारणता 120 विद्यार्थ्यांचे एकदिवसीय शिबिराचेआयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्घाटक तसा अध्यक्ष मा. श्री बी सी येळे विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग जिल्हा चंद्रपूर यांनी वनाविषयी सखोल असे मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मा.श्री. व्ही ए राजूरकर वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण परिक्षेत्र मुल तसेच ज्यांच्या भूमीमध्ये या शिबिराचा आयोजन केलं त्या प्रकल्पाच्या मुख्य माननीय योगिता पाटील मॅडम सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ प्रकल्प व मा.सरस्वती गणवीर सोमनाथ प्रकल्प गाईड तसेच या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित असलेले श्री डी .जी.ढवस सर स्वर्गीय बापूजी पाटील हायस्कूल राजगड ,श्री पीजदूरकर सर देवनील विद्यालय टेकाडी, पर्यावरण सखी माननीय वर्षा भांडारकर मॅडम नवभारत विद्यालय मुल सर्व शाळांचे पर्यावरण शिक्षक पर्यावरण दूर शिक्षिका तथा सर्व संबंधित शाळांचे राष्ट्रीय हरित सेनेचे विद्यार्थी भाग घेतले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. ढवस सर यांनी केले त्यात राष्ट्रीय हरित सेनेचे उद्देश कार्य आणि गरज याबाबत आपल्या प्रास्ताविकेत सांगितले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय बि सी येळे साहेब यांनी वनांचे महत्त्व वनांची क्षेत्र विद्यार्थ्यांचे कर्तव्य याबाबत माहिती सांगितली तसे सौ वर्षा भांडारकर मॅडम यांनी बॅनर च्या माध्यमातून वनांचे, वृक्षाचे महत्व मातृ वृक्षाचे महत्व याबाबत माहिती विशद केली माननीय पिजदुरकर सर यांनी पर्यावरणावरबाबत माहिती दिली या कार्यक्रमात बऱ्याच शाळांच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य तसेच आपले मनोगत व्यक्त केले शाळेच्या विद्यार्थ्यामार्फत वन पर्यावरण शपथ घेण्यात आली.

या कार्यक्रमाचे संचालन सर्व सौ नागीलवार मॅडम यांनी केली व आभार प्रदर्शन खरकाडे सर यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाच्या यशस्वी साठी सामाजिक वनीकरण परिक्षेत्र मुल येथील श्री व्ही एल उगे वनपाल सामाजिक वनीकरण मूल श्री एम जि घोडमारे वनपाल सामाजिक वनीकरण मूल, कु ए ए गीते वनरक्षक सामाजिक वनीकरण मूल त्यांची चमू यांनी सुंदर असे आयोजन केले या कार्यक्रमानंतर सोमनाथ प्रकल्पातील शेतीचे व नर्सरी सर्व विद्यार्थ्यांना दर्शन घडविण्यात आले व त्यानंतर भोजनाचा कार्यक्रम झाला व त्यानंतर सर्वांना वनभ्रमंतीचा आस्वाद घेण्यात आला.