मार्कंडेश्वर देवस्थानच्या जिर्णोध्दाराच्या रखडेल्या कामासाठी जिल्हाधीकारी कार्यालयावर भव्य मोर्चा धडकला

429

 

संत मुर्लीधर महाराज यांच्या नेतृत्वात मोर्चा

चामोर्शी तालुक्यातील मार्कडेश्र्वर देवस्थानचे रखडलेले काम मागील नवं वर्षांपासून भारतीय लोकप्रतिनिधीचे व पुरातत्व खात्याच्या दुर्लक्षतेमुळे अद्याप पूर्ण झाले नाही त्यासाठी हरनघाट येथील संत मूर्लीधर महाराज यांच्या नेतृत्वात इंदिरा चौकातील शासकीय विश्राम गृहा पासून भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत शासनाचे लक्ष वेधण्यात आले.


विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या वैनगंगा नदीच्या तीरावर वसलेले मार्कंडेश्वर देवस्थान चे जीर्णोध्दार काम व्हावे म्हणून वेळोवेळी देवस्थान ट्रस्ट, सामाजिक संघटना यांच्याद्वारे पत्रव्यवहार केला पन काम सुरू झाले नाही मात्र मिळाले ते फक्त आश्वासने तेही पूर्ण आश्वासन करू शकले नाही त्यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या त्याची दखल घेत संत मूर्लीधर महाराज यांनी ०९ फेब्रुवारी रोजी मार्कडा तसेच जिल्हातील भाविकांची व ग्रामस्थांची बैठक आयोजित केली होती त्या बैठकीत १६ फेब्रुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा व त्याच दिवशी सायंकाळी चार वाजता मार्कंडा मंदिरासमोर साखळी उपोषण व २२ फेब्रुवारी पासून संत मूर्लीधर महाराज आमरण उपोषणाला बसणार असे ठरविण्यात आले होते.


त्याच बैठकीत मार्कंडेश्वर मंदिराच्या जिर्णोध्दाराच्या कामाला गती देण्यासाठी 105 कोटी रूपयांचा निधी मंजुर केलेला आहे. यामुळे मंदिराचे काम येत्या 10 दिवसात सुरू करावे, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय समोर अन्नत्याग उपोषण करणार असा इशारा, हणरघाट धाम येथील संत मुर्लीधर महाराज यांनी दिला आहे. होता मात्र दखल घेतली नाही त्यामुळे १६फेब्रुवारी रोजी मोर्चा काढण्यचां निर्धार करण्यात आला होता दरम्यान
विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या मार्कंडादेव येथील मार्कंडेश्वर मंदिराच्या जिर्णोध्दाराचे काम पुरातत्व विभागाकडून हाती घेण्यात आले. नाही. त्यामुळे काम तातडीने सुरू करण्याबाबत संत मुर्लीधर महाराज यांच्या शिष्टमंडळाने 29 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी संजय मिणा यांना निवेदन देवून तातडीने काम सुरू करण्याची मागणी केली होती. याची दखल घेतआगामी निवडणूक लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी मार्कंडादेव येथे भेटीदरम्यान जिर्णोध्दाराच्या कामाचा आढावा घेऊन एमएमआरडीसीच्या माध्यमातून 100 कोटी व पुरातत्व विभागाच्या 5 कोटी रूपयांच्या निधीतून काम लवकरात लवकर करा, असे निर्देश सबंधितांना दिले. होते मात्र काम सुरू झाले नाही अखेर १६ फेब्रुवारी रोजी गडचिरोली शहरातील इंदिरा चौकातील शासकीय विश्राम गृह पासून भव्य मोर्चा संत मुर्लीधर महाराज यांच्या नेतृत्वात काढण्यात आला त्यावेळी. सुनील शास्त्री महाराज, नेवारे महाराज गोठनगाव, बाल स्वामी महाराज, मार्कडा, परमेश्वर महाराज , मनीष महाराज,गोविंदजी सारडा, सुशील सूर्जन, हेमंत राठी, अभिजित कोरडे, श्रीकांत भृगवार, येमाजी पिपरे, प्रमोद भगत, सुनील दीक्षित,सुनील बोमनवार, विजय कोमरवार, रितेश पलारपवार, रमेश बारसांगडे दिलीप चलाख, मनोज हेबिज, दिगंबर धानोरकर, अशोक पोरेडीवार , निरज रामानुजवार, अजय चींतलवार, येलमुले , मृतुंजय गायकवाड


,यांच्या उपस्थित मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला त्यानंतर जिल्हाधिकारी यांना संत मूरलीधर महाराज यांच्या शिस्ट मंडळाने निवेदन देण्यात आले त्यावेळी खासदार अशोक नेते, प्रशांत वागरे, बाबुराव कोहळे, स्वप्नील वरघंटे उपस्थित होते मात्र निर्णय होऊ शकला नाही त्यामुळेसाखळी उपोषण करण्याचा निर्धार मुरलीधर महाराज व सुनील महाराज शास्त्री यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना साखळी उपोषण करू असे सांगितले यावेळी अनेक भाविकांनी मनोगत व्यक्त केले तर, या मोर्चाला मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील बऱ्याच गावातील महीला पुरुष भाविक मोर्च्यात सहभागी झाले होते यावेळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता .