राजुरा ,संतोष कुंदोजवार :–
आज दिनांक २४ मार्च रोजी राजुरा तालुक्यातील सिंधी येथे शेतशिवारात विज पडून ७ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. सर्व जखमींना उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
आज दुपारी १ वाजेदरम्यान सिंधी येथील मधुकर धानोरकर यांचे शेतात शेतमालक स्वतः, त्यांची पत्नी व इतर १५ मजुर काम करित असताना मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली व अचानक पणे विज कोसळून मधुकर धानोरकर, उषा सुरेश चौधरी हे जखमी झाले याशिवाय किरण पुरुषोत्तम चौधरी, माधुरी भाष्कर मोरे, मंदाबाई मधुकर धानोरकर, मृनाल शेषराव बोबडे, अर्चना सुनिल चौधरी असे इतर जखमी झाले असून उपचारार्थ ग्रामीण रुग्नालय राजुरा येथे दाखल करण्यात आले आहेत. या सर्वांवर उपचार सुरू आहेत.
यापैकी मधुकर उद्धव धानोरकर व उषा सुरेश चौधरी हे जास्त जखमी आहेत सदर माहिती मिळताच माजी सभापती आबाजी पाटील ढुमणे, उपसरपंच रामभाऊ ढुमणे, भाष्कर मोरे, भैय्या मोरे, सुरेश ढुमणे, इर्शाद शेख, तलाठी शेंडे यांनी प्रत्यक्ष रुग्नाची मदत करीत उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून दिलासा दिला








