व्याहाड बु. अंतर्गत बाायपास रोड चे मंजूर असलेले सिमेंट रोडचे काम त्वरित सुरू करा-सचिन तंगडपल्लीवार यांचे बांधकाम विभागाला निवेदन

172

सावली तालुक्यातील व्याहाड बु. अंतर्गत बायपास एकोरी माता मंदिर मागील भागात सिमेंट रोड मागील एक वर्षांपासून मंजूर असून त्या रोडच्या कामाला अजूनपर्यंत सुरवात झालेली नाही. त्यामुळे मंजूर असलेले सिमेंट रोड चे काम त्वरित सुरू करा अन्यथा आंदोलात्मक पवित्रा घेवू असे भाजपा नेते सचिन तंगडपल्लीवार यांनी देत सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले आहे.

व्याहाड बुज च्या बायपास रोड ची अत्यंत दयनिय दुर्रव्यवस्था झालेली आहे. त्या रोड वर वाहतुकीची संख्या मोठी आहे.मात्र रस्ता खराब असल्याने त्या ठिकाणी अपघाताची मालिका सुरू झालेली आहे.समोर मृग नक्षत्र लागणार आहे.त्यानंतर तर या रस्त्यावरुन चालनेही मुश्किल होऊन जाईलआणि जनतेला फार मोठा त्रास सहन करावा लागेल. या रस्त्यावरून वाहतूक करण्यासाठी जवळपास आठ राईस मिल या रोड च्या संपर्कात येतात तसेच 20 गावांचा संपर्क येतो. त्यामुळे वाहनांची दुर्दशा होऊन राहलेली आहे. आणी शेतकऱ्यांना सुद्धा शेतमाल ने – आण करण्यासाठी नाहक त्रास होऊन राहिलेला आहे. वर्षभरापासून मंजूर झालेला काम ताबडतोब चालू करावे. जेणेकरून जनतेला त्रास कमी होईल आणी अपघाताचा प्रकार होणार नाही असे पत्र भाजपा तालुका महामंत्री तथा कृषी उत्पन्न वाजार समितीचे संचालक सचिन तंगडपल्लीवार यांनी सावली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी यांना दिले.

दिलेल्या समस्यांचे निराकरण करा व निवेदनाची दखल घेत काम सुरू करा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा गर्भित इशारा ही तंगडपल्लीवार यांनी दिलेला आहे. यावेळी भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष नितीन कारडे,नामदेव भोयर,जितू सोनटक्के,नरेश बाबनवाडे, रामचंद्र ठाकूर यावेळी उपस्थित होते.