शेतात निंदन करीत असतांना पती-पत्नीवर मधमाशांच्या हल्ला;2 जण गंभीर जखमी

3729

शेतात निंदन करीत असतांना पती-पत्नीवर मधमाशांच्या हल्ला;2 जण गंभीर जखमी

सावली शहरातील रामभाऊ वनकर वय 60 वर्ष व त्यांची पत्नी गोपीकाबाई वनकर वय 58 वर्ष हे आज असोला मेंढा नहरा जवळील शेतात निंदन चे काम करण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर आज सकाळच्या सुमारास आंब्याच्या झाडावर बसलेल्या मधमाशांनी जोरदार हल्ला केला त्यात दोघेही पती पत्नी गंभीर जखमी झाले आणि त्यांच्या संपूर्ण मधमाशांमुळे एक तास शेतात पडून राहिले सदर घटनेची माहिती होताच दोघांनाही सावलीतील ग्रामीण रुग्णालय भरती करण्यात आले.

त्यानंतर या दोघांना जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली ते भरती करण्यात आलेली आहे. रामभाऊ वनकर यांची प्रकृती अधिक गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथील खाजगी रुग्णात भरती करण्यात आल्याची माहिती असून गोपिकाबाई वनकर ही जिल्हा सामान रुग्णालयात भरती आहे.