अखेर विरखल येतील घरात घुसलेल्या अस्वलाला वनविभागाने केल जेरबंद

4963

अखेर विरखल येतील घरात घुसलेल्या अस्वलाला वनविभागाने केल जेरबंद..

 

सावली वनपरिक्षेत्रातील उपवनक्षेत्र व्याहाड, नियतक्षेत्र गायडोंगरी, अंतर्गत मौजा विरखल चक चे शेतशिवार व गाव शिवारात मागील चार-पाच दिवसापासून वन्यप्राणी अस्वलाचे अस्तित्व गावकऱ्यांना निदर्शनास येतात याची माहिती वनविभागाला देण्यात आली. मागील चार ते पाच दिवसापासून नियत क्षेत्र वनरक्षक गायडोंगरी व PRT टीम निफंद्रा सदरचे अस्वलावर लक्ष ठेवून मागवा घेत होते.

दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 8.00 वाजता चे दरम्यान गावाजवळ आली असता गावातील लोकांच्या जमावाने आरडाओरड केल्याने भीतीपोटी अस्वल गावालगत असलेल्या चिंचेच्या झाडावर चढून बसली.
सदरची अस्वल रात्रभर झाडावरच होती परंतु पहाटे 5 वाजता चे सुमारास अस्वल झाडावरून उतरून वीरखल येथील श्री भास्कर लक्ष्मण मारभते यांच्या नवीन बांधकाम सुरू असलेल्या घरात शिरली हे दृश्य पाहत असलेल्या वनविभागाचे गस्तीवर असलेल्या वनकर्मचारी यांनी तात्काळ सदर घराचे दरवाजे बंद केले व
याबाबत वरिष्ठ वनाधिकारी यांना माहिती दिली. विकास तरसे सहाय्यक वनसंरक्षक चंद्रपूर वन विभाग चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली विनोद धुर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी सावली यांचे नेतृत्व, श्री घनश्याम नायगावकर वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रपूर, कु . इंगळे परिविक्षाधीन वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. कुंदन पोडचेलवार पशुधन विकास अधिकारी टीटीसी चंद्रपूर, RRU टीम चंद्रपूर यांनी सदरचे अस्वलास पिंजऱ्यात जेरबंद केले.

राखुंडे क्षेत्र सहाय्यक व्याहाड, पाटील क्षेत्र सहाय्यक पाथरी, एकनाथ खुडे, वनरक्षक गायडोंगरी, वनरक्षक भोला सोनेकर, अविनाश नाने, महादेव मुंडे, डांगे, कराड, सुषमा मेश्राम व PRT निफंद्रा, गवरला, शिरसी व ईश्वर गंडाटे आणि इतर वन कर्मचारी व गावकरी यांनी मोलाचे सहकार्य केले.

सदरचे अस्वलास पुढील उपचाराकरिता TTC चंद्रपूर येथे हलविण्यात आले असून गावकऱ्यांनी अस्वल पकडल्याने सुटकेचा श्वास घेतलेला आहे असोला बघण्यास हजाराची गर्दी जमा झालेली होती.