
सावली नगरपंचायत च्या नगराध्यक्ष पदी आज दिनांक 21 मे ला कांग्रेस च्या साधनाताई वाढई यांची अविरोध निवड करण्यात आली.

दोन दिवसांपूर्वी नगराध्यक्ष लताताई लाकडे यांनी जिल्हाधिकारी यांना आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता त्यामुळे आज विशेष सभा आयोजित करून दुपारी 2 वाजेपर्यंत नगराध्यक्ष पदाकरिता अर्ज सादर करायचा होता यावेळी सर्वसाधारण महिला असल्याने कांग्रेस च्या साधनाताई वाढई यांचा एकमेव उमेदवारी अर्ज सादर झाल्याने त्यांची अविरोध निवड करण्यात आली.यावेळी उपाध्यक्ष संदीप पुण्यपकार, नगरसेवक विजय मूत्यालवार,माजी नगराध्यक्ष लता लाकडे,प्रीतम गेडाम,प्रफुल वाळके,सचिन संगीळवार,अंतबोध बोरकर,नितेश रस्से,ज्योती शिंदे,ज्योती गेडाम,सीमा संतोषवार,प्रियंका रामटेके,अंजली देवगडे यावेळी उपस्थित होते.यावेळी सर्वानी नगराध्यक्ष साधनाताई वाढई यांचे अभिनंदन केले.
साधनाताई ईश्वर वाढई हे दोन वेळा ग्रामपंचायत सदस्य व दुसऱ्यांना नगरसेवक बनले आहे.निवडणूक होताच या नगराध्यक्ष पदी विराजमान होईल असा अंदाज होता मात्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी सुशिक्षित शिक्षिका म्हणून लताताई लाकडे यांच्या नावाला पसंती दिली व त्यांना बनविले.मात्र काही दिवसातच नगरपंचायत मध्ये अंतर्गत धुसपुस सुरू झाली. आणि अखेर राजीनामा नाट्य घडल्याने आज पुन्हा 17 महिन्यासाठी नगराध्यक्ष पदावर साधनाताई वाढई यांची निवड करण्यात आली आहे. सावली शहरातील योजनेच्या बट्याबोळ झाल्याचे सद्या पहायला मिळत असून प्रभाग क्रमांक 1,8,9,10,11,12,13,14 मध्ये असलेली पाणी समस्या यावर नवीन नगराध्यक्षा काय उपयोजना करतात याकडे लक्ष लागलेले आहे.
साधनाताई वाढई यांची नगराध्यक्ष पदी निवड होताच सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.