सावली तालुक्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून घरकुलधारकांना रेतीसाठी वन वन भटकावे लागत असल्याने संबंधित घरकुलधारकांना मोफत रेतीचे वाटप करण्यासाठी आता शासनाने पावले उचलली असून सावली तालुका प्रशासनाच्या वतीने आता घरकुल लाभार्थ्यांना घरपोच टीपीचे वाटप सुरू करण्यात आलेले आहे आणि त्याच्या शुभारंभ उद्या दिनांक 21 ला सकाळपासून करण्यात येणार आहे यासंदर्भात आज सावली तहसील कार्यालयात सर्व ग्रामसेवक व तलाठींना संयुक्त रित्या टीपी बुकचे वाटप करण्यात आलेले आहे.

 

उपलब्ध माहितीनुसार सावली तालुक्यामध्ये एकूण 54 ग्रामपंचायत व एक नगरपंचायत व तीन गट ग्रामपंचायत यांच्यामध्ये 9558 घरकुलचे लाभार्थी आहे. या लाभार्थ्यांना आता घरकुल बांधकाम साठी आवश्यक लागणाऱ्या रेती आणण्यासाठी मोफत टीपी उपलब्ध करून देण्यात येत आहे. सावली तालुक्यात घरकुलधारकांना रेती उपलब्धता करून देण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी तसेच काँग्रेस,सरपंच संघटना व इतर राजकीय पक्ष व सामाजिक संस्थेने केलेली होती या मागणीची दखल घेत प्रशासनाने त्वरित पावले उचलीत आज पासूनच मोफत टीपी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. आज 2500 ब्रास टीपी आज ग्रामसेवक व तलाठींच्या हस्ते वाटप करण्यासाठी प्रदान करण्यात आलेले आहे.

तसेच खनीकर्म विभागाचा उपलब्धतेनुसार ऑफलाइन टीपी हे लवकरात लवकर सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. सावली तालुक्यातील रेती साठाचे 15 वाळू गट हे तयार करण्यात आलेले आहे. आणि इथूनच रेतीचा उपसा होणार आहे त्यामुळे आता घरकुल लाभार्थ्यांसाठी रेतीच्या प्रश्न हा मिटण्याची शक्यता आहे त्यामुळे लाभार्थ्यांनी रेतीसाठी टीपी त्यांना घरपोच उपलब्ध करून देण्यात येणार असून आवश्यकतेप्रमाणे रेतीची उपलब्धता करून घ्यावी व सुलभता निर्माण करण्यासाठी मंडळ अधिकारी व विस्तार अधिकारी यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्त केलेले आहे.तसेच नियंत्रण कक्ष हे तहसील कार्यालयात स्थापन करण्यात आले आहे. घरकुल लाभार्थ्यांना ऑफलाईन टीपी प्राप्त झाल्या नंतर 9 जून पर्यंत मोफत रेती मिळणार आहे.आणि सर्व लाभार्थी यांना घरपोच मोफत टीपी मिळणार आहे त्यामुळे कुणीही लाभार्थी संभ्रम मध्ये राहू नये तसेच टीपी मोफत असून कुणी पैसे मागितल्यास नियंत्रण कक्षाला कळवावे असे सावलीच्या तहसीलदार प्रांजली चिरडे यांनी म्हटले आहे.