सावली येथील प्रभाग 5 मधील कुणाल केशव गेडाम हा ट्रॅक्टर गाव तलावात धुण्यासाठी नेत असतांना ट्रॅक्टर ने पलटी मारली त्यात कुणाल हा दबून जागीच ठार झाल्याने खळबळ माजली आहे. ही घटना आज 2 वाजता सुमारास घडली.

एकुलता एक मुलगा असलेला कुणाल हा नेहमीच ट्रॅक्टर चालवायचा.शेतात काम केल्याने ट्रॅक्टर मातीने भरून आहे म्हणून घराजवळील गाव तलावात तो पाळीवरून खाली जात असतांना
ब्रेक लागले नाही आणि तलावात पलटी खाली व त्या ट्रॅक्टर च्या खाली कुणाल दबला गेला त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती होताच शेकडो लोक घटनास्थळी दाखल झाले.सावली पोलिसांना माहिती होताच त्वरित दाखल होवून त्या दबलेल्या युवकाला लोकांची सोबत घेवून बाहेर काढले व सावली ग्रामीण रुग्णालयात नेले असता मृत असल्याचे सांगितले.

सदर घटनेने सावली परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
घटनेचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले.आजच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.