
**********🤔🙏***********

*आपण संगणक युगात प्रवेश करून विश्व गुरूच्या स्वप्नात जात असले तरी मुलामुलींच्या विवाहाची जिम्मेदारी आजच्या काळात पार पाडने फार मोठी कठीण समस्या होऊन बसली आहे. सांगायाचे झाल्यास विवाह झाल्या नंतर वैवाहिक जीवनात होणारे अंशिक वाद, त्या वादातून होणारी हतबलता नंतर तुटातूट, घटस्फोट,न्यायालय या सारख्या घटना मुलामुलींच्या & पालकांच्या जीवनात काळजीच्या चिंताग्रस्त ठरत आहे. या सारख्या घटना होण्यास मुलांमुली बरोबर त्यांचे पालकही तेवढेच कारणीभूत ठरले आहेत असे निदर्शनात येऊ राहाले आहेत….*
*मुलांमुलींच्याच्या वाट्यालाही अनेक समस्या येतात. जोडणी, साक्षगंध वा विवाहानंतर मुला/मुलीच्या अधिकतर व्यसनधिनाता, प्रेमप्रकरणामुळे लग्न तुटल्याचे अनेक उदाहरणे आहेत. काही मुलं-मुली तर “साक्षगंध” काही तर लग्न झाल्यावरही विवाहानंतर बंधने तोडण्याची/पळाल्याची अनेक उदाहरणे इतरही समाजात वर्तमान पत्रात वाचण्यात आली आहे. कानावर आली आहेत. मुला-मुलींनीही आपली वैचारिक परिपक्वता व धाडस दाखवून आपल्या पालकांसमोर अगोदरच आपल्या प्रेम संबंधाबाबत पालकांकडे पूर्व सूचना देवून आपल्या योग्य निर्णयाची चर्चा करावयास हवी. जेणेकरून सदैव मान वर असणाऱ्या आईवडिलांची मान आयुष्यभर खाली जावयास नको आहे. मुलामुलींनीही आपल्या सुंदर आयुष्याची स्वप्ने रंगवितांना तारुण्यात झालेल्या चुकांचे विवाहात रूपांतर करतांना पालकांसमोर आपले विचार पोहचविणे गरजेचे आहे. पालकांनी याबाबत योग्य ते समाज, प्रबोधन करून मुलांमुलीची योग्य समजूत घालने गरजेचे आहे. मुलींनीही याबाबत आईवडील व त्यांचे व आपलेही समाज आणि नातेसंबंधात असलेल्या सामाजिक प्रतिष्ठेला तडा जाणार नाही. आईवडिलांनी आपणास हातावरील फोडाप्रमाणे जपले तेंव्हा याबाबत पुढील पाऊल टाकतांना आपल्या परिवाराला विश्वासात घेवून आपल्या प्रेमविवाहाचा निर्णय घ्यावा जो “सर्वमान्य” असेल. वैवाहिक जीवनाची सुंदर सुरवात प्रगल्भ वैचारिकतेतून करावयास हवी.*
*”लग्न तोडणे!” हा त्यावरचा स्थायी उपाय नाही. कारणांच्या गर्दीत कदाचित हा निर्णय योग्यही असू शकतो. तरीही काही प्रश्नांचे उत्तरे आपणच शोधले पाहिजे. मुलगा/मुलगी लग्नाची होईपर्यंत आपण फक्त आपल्या परीवारापुरतं स्वतःला बांधून घेतलं होतं काय ? कधी समाज बांधवांच्या व समाजाच्या सामाजिक कार्यात समोर येवून उस्पूर्त सहभाग घेतला काय ? याचे उत्तर “नाही!” असेल तर त्यामुळे आपले हित, मैत्री & सामाजिक संबंधाचा विस्तारवाद झाला नसावा? अनेक परिस्थितीजन्य कारणे असू शकतात. यामुळे सामाजिक जडणघडण कळली & घडली नाही हीच चूक वेळ निघून गेल्यावर कळली मात्र उपयोग नाही. मुलगा, मुलगी लग्नाची होताच त्यांना घेवून एकदा नाही तर अनेकदा नौकरी, उद्योग, व्यवसाय, शिक्षण आणि समाजाची आजची सामाजिक स्थिती यावर आपली कौटुंबिक चर्चा करून वैचारिक देवाणघेवाण व त्यांच्या भावनेचा, मताचा आदर आवश्यक आहे. अगोदरच्या काळात शिक्षणाचे, प्रबोधनाचे साधने नव्हती. प्रमाणही कमी होते. आज ती परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. शिक्षणाचे प्रमाण वाढून मुलंमुली विचाराने प्रगल्भ झाले आहेत. मुलगा नौकरी व व्यवसायी आणि चांगला आहे. मुलगी शिक्षित, नोकरीवर, सुंदर आहे एवढ्यावरच न थांबता त्यांच्या परिवाराची सामाजिक जाण व मुलामुलीची जीवनशैली आवडीनिवडी,भविष्यातील लक्ष, माहिती प्रत्यक्ष संवाद करून वा मिळेल त्या साधनांनी करून घेणे आवश्यक आहे. पाहणी वेळी अपेक्षेप्रमाने त्यांच्यात संवाद होवू देण्याची प्रक्रियाही अतूट बंधनात महत्वपूर्ण ठरते. ती संवाद प्रकियेला दोन्ही परिवार मंडळींनी समोर येवून प्रोत्साहन दिले पाहिजे.*
*समाजाच्या सामाजिक कार्यातही फक्त वर्गणी/देणगी देवून आपले दायित्व पूर्ण होत नाही. तर समाजात आपले सामाजिक प्रतिनिधित्व & कृतीही गरजेची आहे. तरच असल्या तत्स्मम बाबी आपल्या जवळच्या हितचिंतकांकडून कळायला सोप्या होतात. निव्वळ संबंधितावर विश्वास ठेवून काम भागेल मात्र त्यातील पारदर्शकता स्वताला समाधान देणारी असली पाहिजे. याकरिता पालकांनी धाडसाने सामोर येवून विचारपूस करणे गरजेचे आहे. आपली देहबोली, स्पष्टवक्तेपणा, विचार & कृतींचा सामाजिक विश्वास असल्या वेळी अधोरेखित होतो. आज बदलत्या काळात वर,वधू शोधणे कठीण कार्य आहे. अनेक कुटुंब नोकरी, रोजगारासाठी दूरवर वास्तव्यास आहेत. त्यांनीही आपली उपस्थिती अधूनमधून सामाजिक,कौटुंबिक कार्यात लावून समाज, संबंधहीत जोपासले असेल तर ते अधिक भाग्यवान आहेत. मात्र असेही अनेक कुटुंब आहेत ते फक्त मुलंमुली विवाहाच्या होताच विवाहाचे प्रस्ताव घेवून संवाद आणि कार्यक्रमात हजेरी लावून चिंतेत मार्गक्रम करीत आहे. मुलामुलींचे वय वाढल्याबरोबर पालकांच्या चिंता आणि झोपमोड व चिंतेची गुंतागुत त्यांचे तेच समजू शकतात?*
*करीताच असल्या चिंतेचा प्रश्नांची धग घेवून ती विझवायला आम्ही सारे “पद्मशाली फाउंडेशन” च्या वटवृक्षाखाली एकत्र आलेलो आहोत. बदलत्या काळात संपन्न झालेल्या 26 नोव्हेंबरच्या वधुवर परिचय मेळाव्यात परिचय देवून आपली छाप समाजमनावर पाडली असेलच. यातूनच पसंती, विवाहजोडणीची माहिती काढता येवू शकते. अनेकांचा दुरावलेले स्नेहबंध या भेटीतून परत जोडला असेल. नव्या ओळख्या,नवे संबंध,नवे भेटी यातून झालेल्या असतील व आपल्या मुलामुलींना यातून नवा आत्मविश्वास त्यांच्या मनात पेरता असेल करीताच असल्या परिचयातून आपले पाऊल पडणे महत्वाचे आहे.*
*दोष देतांना निव्वळ मूलंच नाही तर अनेक ठिकाणी मुलींच्या बाबतीतही असे वाईट प्रसंग समाजासमोर आहेत. निव्वळ मुलगी या नात्याने त्याची चर्चा होत नसली किंवा चर्चेचे धाडस आपण करीत नसलो तरी मुलींच्याही समस्या समाजात आहे. मुलींची गैरवर्तणूक, अनेक काही कारणे, मुलींच्या बाबतीत विवाहानंतर मुलींच्या पालकांचा अधिक वावर & हस्तक्षेप अधिक धोकादायक ठरतांना दिसतो आहे. या पुरुषप्रधान संस्कृतीत मुलांचे गैरवर्तन,कृती आपसूकच झाकल्या जाते.*
*पालक या नात्याने आम्ही किती जागरूक आहोत व विवाहाच्या चर्चा कुटुंबात बसून मुलामुलींसमोर अनेक पैलूवर विश्वासाने करतो की नाही? की जावई, सून म्हणून आमच्या अपेक्षा वारेमाप राहून त्यांच्या आजच्या सामाजिक परिस्थितीत त्याच्या योग्यतेबद्दल आपल्या संबंधित हितचिंतकांपुढे त्यावर चर्चा करणे आवश्यक होवून बसले आहेत. मोबाईल चा अधिक वापर, लागलेले व्यसन, निर्माण होणारे “शक” समस्या निर्माण करतात.अश्यावेळी पालक या नात्याने सकारात्मक सूचना,शंका, समाधान पुढील दुषपरिणाम यावर चर्चा, समज आवश्यक आहे. पालक या नात्याने योग्य वयात योग्य वेळी मुली,मुलांचे प्रश्न समजून घेवून त्यांच्या आवडीनिवडी नुसार व आपल्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे. ज्यांच्याकडे आहेत त्यांच्याविषयी नाहीच मात्र ज्यांच्याकडे त्या प्रमाणात आर्थिक पाठबळ नाही त्यानी मात्र सामूहिक मेळाव्यात लग्नाची कौटुंबिक चर्चा करून बैठकीत याचे महत्व आपल्या प्रभावी मुद्यातून प्रामाणिकतेने दोन्ही पक्षांना समजावून देणे आवश्यक आहे. बदलत्या काळात पैश्याची बचत गरजेची आहे.*
*ज्यांच्याकडे नाही अशांनी मोठ्या कर्जावू, दिखावू लग्नापेक्षा छोटेखानी विवाह, पैशाची बचत, त्यातून आपल्या व्यवसायात थोडं फार पैसा लावून त्यातूनन व्यवसायात घेतलेली झेप आपल्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरू शकते. विचारांची सीमा वृध्दींगत करून चांगल्या सुखकर भविष्याची हमी देवू शकते यावर परिवारात चिंतन होणे काळाची गरज आहे. आपल्या विश्वासू सोबत याची माहिती देणेघेणे गरजेचे आहे. चर्चेतून अनेक बाबी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीत्या आपणास कळतात. आपले व कौटुंबिक समाधान गरजेचे आहे. घाईत व निव्वळ संबंधितावर पूर्णतः विश्वास ठेवून वैवाहिक संबंध जोडू नये असे आज वाटायला लागले आहे. कदाचित मी चूक असू शकतो मात्र ही काळाची गरज आहे असं मला वाटते. अलीकडेच “पद्मशाली फाउंडेशन” चा मेळावा चंद्रपुरात उत्साहात पार पडला. आम्ही “प्रवेश फी” घेवून प्रवेश दिला आणि त्याला समाजबांधव व भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मात्र खेदाने नमूद करावयासे वाटते की, नोंदणी केलेल्या उपस्थित उपवर मुलांनी आपला परिचय दिला मात्र उपस्थित मुलींनी स्वतः बरोबर “आईवडील मुफ्त” प्रवेश योजनेचा भरभरून फायदा घेतला. उपवरववधूंची परिचयाची संख्या वाढावी या हेतूने हे पाऊल टाकल्या गेले मात्र स्वतःला सुक्षिशित,प्रतिष्ठित समजणारा वर्गाचं मात्र उपस्थित राहूनही परिचय पिठावर येवून परिचय दिले नाही.अनेक पालक,उपवधू सोबत मेळावा पहायला आलेत की, आपल्या विवाह समस्येच्या समाधानाकरीता? “फाउंडेशन” टीम नी जी मेहनत घेतली व समाजाने उदार मनाने देणगी दिली त्याचे फलित काय? हे सारे कुणासाठी आहे? आपले सहकार्य काय? समाज अनुकरणीय असतो. ही आपली भूमिका उद्याच्या उपवरवधुंना व त्यांच्या पालकांना & समाजालाही हिताची नाही. कारण एकदा समाजात नकारात्मक वारे पसरले तर असल्या मेळाव्याच्या विश्वासर्हतेवर प्रश्न उभे राहील. जेंव्हा पुढे आपल्या घरात विवाहाचे असेल तेंव्हा मागील आपल्या भूमिकेचं अर्थ कळेल. यावर आपण सर्वांनी चिंतन व विचार मंथन करणे आवश्यक नाही तर गरजेचे आहे. नाही तर असल्या मेळाव्याला “अर्थ” उरणार नाही.*
👍🙏
. .
*रवींद्र रा. बोम्मावार*
*संचालक,पद्मशाली फाउंडेशन*
📞 *9421623762*
*{लेखप्रपंच आवडल्यास,सहमत असल्यास समाजाच्या प्रत्येक ग्रुप व आपल्या संबंधितांना फॉरवर्ड करू शकता.}*