चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय मार्गावर भीषण अपघात 2 जण जागीच ठार 1 गंभीर

1739

चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय मार्गावर भीषण अपघात 2 जण जागीच ठार 1 गंभीर
सावली तालुक्यातील हिरापूर जवळील घटना

 

सावली(तालुका प्रतिनिधी) चंद्रपूर- गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील हिरापूर फाट्याजवळ गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी जवळील मोहूर्ली एका दुचाकी स्वारास एका अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने जागेवरच दोन युवक ठार झाले असून एक युवक गंभीर जखमी झाला आहे त्याला उच्चारर्थ जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे हलविण्यात आलेले आहे.


सावली पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या हिरापूर फाट्याजवळ एम एच 33 बी7986 या क्रमांकाच्या दुचाकी वर गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मोहूर्ली येथील नागेश भगत, सौरव मांडवकर व मशाखेत्री असे तीन युवक गाडीवरून प्रवास करत असतानाच एका अज्ञात वाहनाने यांना जबर धडक दिल्याने नागेश भगत व मशाखेत्री हे युवक जागेवरच ठार झाले आहे.तर सौरभ मांडवकर हा युवक गंभीर जखमी असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भरती करण्यात आले. सदर घटनेची माहिती सावली पोलिसांना मिळताच सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप पुलरवार हे आपल्या समोर घटनास्थळी दाखल झाले व वृत्त का दोन्ही मृतांना उपजिल्हा रुग्णालय मुल येथे देण्यासाठी पाठविण्यात आलेले असून गंभीर असलेला मांडवकर यांना उपजिल्हा रुग्णालय गडचिरोली ते पाठवण्यात आलेले आहे. सदर अपघात नेमका कसा घडला याबाबत सध्या तपास सुरू आहे. मात्र घटनास्थळावरील अपघाताची दृष्ये पाहून अनेकांची मने सुन्न झाली.