संविधान दिनानिमित्त बुद्ध भिम गितांचा बहारदार कार्यक्रम ;बौध्द समाज कमेटी बोथली यांचे आयोजन

336

 

सावली तालुका प्रतिनिधि

केंद्र सरकारने २६ नोव्हेंबर हा ‘संविधान दिन’ म्हणून जाहीर केल्या नंतर या दिवसाच्या निमित्ताने शासकीय स्तरावर या दिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते,शाळा , महाविद्यालय, तसेच विविध शासकीय कार्यालयात कार्यक्रम घेतले जातात,
या दिवसाचे औचित्य साधून बौद्ध समाज कमेटी बोथली द्वारे आयोजित आणि साथ फाउंडेशनच्या सौजन्याने दि.२६ नोव्हें.२०२५ रोज बुधवारला डॉ ‌.बाबासाहेब आंबेडकर चौक,बोथली येथे सायं.७.००वा. सुप्रसिद्ध गायक मुकेश कुमार प्रस्तुत बुद्ध भिम गितांचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.सदर कार्यक्रमांचे उद्घाटन रोहित बोम्मावार , संचालक चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तथा अध्यक्ष साथ फाऊंडेशन यांच्या हस्ते होणार आहे.

तरी जनतेने संविधान दिनानिमित्त आयोजित या बुध्दभिम गितांचा कार्यक्रमाचा मोठ्या संख्येने उपस्थित राहून आस्वाद घ्यावा असे आयोजकाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.