पक्षीसप्ताह दरम्यान 225 पक्षांची शिकार ; चौघांना अटक

1902

 

*सावली वनपरिक्षेत्राची धडक कारवाई*

सावली : सौरव गोहने

सावली वनपरिक्षेत्रातील उपवनक्षेत्र व्याहाड नियतक्षेत्र सिर्सी मधील मौजा उमरी तलावात वन्यजीव सप्ताह निमित्य स्थानिक वन कर्मचारी पक्षी निरक्षण दरम्यान रेशाळ कंठारी भिंगरी या पक्षाचे शिकार करताना गडचिरोली जिल्ह्यातील 4 आरोपीस मुद्देमालासह रंगे हात पकडण्यात वनविभागाला यश आले.

सविस्तर वृत्त असे की दरवर्षी पक्षी तज्ञ पद्मश्री स्व. मारुती चितमपल्ली यांच्या जन्मदिवस दिनांक 5 ऑक्टोंबर ते ज्येष्ठ पक्षी तज्ञ स्व. डॉक्टर सलीम अली यांच्या जन्मदिवस 12 नोव्हेंबर दरम्यान संपूर्ण भारतात पक्षी सप्ताह वनविभागातर्फे साजरा केला जातो या दरम्यान कोणते पक्षी स्थानिक आहेत आणि कोणते पक्षी बाहेर देशातून ,राज्यातून आले आहेत त्याचे जीवन क्रम व त्याची ओळख पटवून त्यांचा सखोल अभ्यास केला जातो दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी पहाटेच्या सुमारास सकाळी वनपरिक्षेत्रातील व्याहाड उपवनक्षेत्र नियतक्षेत्र सिर्सी मधील मौजा उमरी तलावात वन्यजीव सप्ताह साजरा करीत असता दरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील 4 शिकारी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे अनुसूचि -11, भाग- 2 मधील अनुक्रमांक 1001 वर समाविष्ट असलेल्या रेशाळ कंठाची भिंगरी या पक्षाची शिकार करीत असल्याची माहिती मिळाल्यावरून तात्काळ घटनास्थळ गाठून आरोपी 1) धोंडू गेडाम वय 34 वर्ष 2) बालाजी प्रताप बालाजी जराते वय 45 वर्ष 3) अरविंद धोंडू गेडाम वय 33 वर्ष 4) मुखरू सखाराम मेश्राम वय 65 वर्ष सर्व राहणार पारडी तालुका गडचिरोली यांना शिकार करताना जाळी -8 नग, थैली 5 नग नायलॉन दोरी 9 बंडल, बांबू काठ्या 16 नग, लाकडी खुंटी -8 नग, शिखरातील मृत पक्षी 225 नग, मोटर सायकल (CB Shine MH-33-X-0113 & Bajaj Discover MH-33-L-3165) 2 मग या शिकारातील मुद्देमालासह पकडण्यात आले.

वरील चारही आरोपीविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम – 1972 चे कलम 9,39,49,50,51 अन्वये वनगुन्हा क्र.204/322851/2025 दि. 07/11/2025 नुसार वनगुन्हा दाखल करण्यात आळे असून सदर कार्यवाही श्री. विनोद धुर्वे, वनपरिक्षेत्र अधिकारी अनंत राखुंडे .,वनक्षेत्र सहायक,व्याहाड, वनरक्षक मुंडे,सोनेकर,खुडे,डांगे यांचेश स्थानिक पिआरटी चमू व बिट सहायक यांनी केली.

पुढील तपास श्री. राजन तलमले विभागीय वन अधिकारी व श्री. विकास तरसे सहायक वनसंरक्षक चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. विनोद दुर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी करीत आहे.