रोहित बोम्मावार यांच्या पक्ष प्रवेशासाठी मुख्यमंत्र्यांनी मला पाठविले- महसूलमंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन

1833

महसूल मंत्री बावनकुळे,आमदार बंटी भांगडीया यांचे प्रभावी भाषण
सावलीत भाजपाचा उत्साह संचारला

 

भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य कार्यकर्ता मेळावा व रोहित बोम्मावार यांचा पक्ष प्रवेश सोहळा अत्यंत उत्साहात हजारोंच्या उपस्थितित पार पडला. या सोहळ्यास जनतेचा, कार्यकर्त्यांचा आणि नव्याने पक्षात दाखल झालेल्या नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा साथ फाऊंडेशनचे अध्यक्ष रोहितभाऊ बोम्मावार यांचा पक्ष प्रवेश महसूल मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाचा दुपट्टा व पुष्पगुच्छ देवून करण्यात आले. तसेच रोहित बोम्मावार यांच्या नेतृत्वात सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमरदिप कोनपत्तीवार, नगरपंचायत सावली चे माजी उपाध्यक्ष भोगेश्र्वर मोहूर्ले,माजी उपसरपंच नरेंद्र डोहणे,कवठी येथील कांग्रेस नेता ईश्वर बत्टे,घोडेवाही येथील सरपंच गीताताई चौधरी, निमगाव येथील सरपंच गीता लंकेश लाडके, लंकेश लाकडे, ग्रामपंचायत चारगाव येथील माजी सरपंच आकाश बुरीवार,उसेगाव येथील युवा नेता राहुल सहारे, गिरीधर उरकुडे,पारडी येथील केशव मेश्राम, मनोज कोसरे,आकापूर येथील धोमेश्वर कोटरंगे, किसानगर येथील मयूर राजपूत, कोंडेखल येथील जावेद उंदिरवाडे या प्रमुखांसोबत सर्व तीनशेहून अधिक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.

राज्याचे महसूल मंत्री मान. चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी आपल्या भाषणात सांगितले — “या परिसरात जनतेचा विश्वास भारतीय जनता पक्षावर दृढ आहे. राज्य व केंद्र शासनाच्या विकासकामामुळे आणि जनतेच्या हितासाठी चाललेल्या कार्यपद्धतीमुळे चंद्रपूर मध्यवर्ती बँकेचे संचालक रोहित बोम्मावार यांनी आज शेकडो कार्यकर्त्यासह भाजपामध्ये प्रवेश केला आहे, याचा मला अत्यंत आनंद आहे.या प्रवेश सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मला पाठविले असे प्रतिपादन बावनकुळे यांनी केले.

हा धान्य उत्पादक पट्टा असून या भागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे धान्य नष्ट झाले आहे असे अनेकांनी मला निवेदन दिले त्यामुळे सर्व शेतीचे पंचनामे करण्यात येऊन सर्व शेतकऱ्यांना मदत देणार असल्याचे म्हटले तसेच ज्यांना जागेचे पट्टे नाही त्यांना पट्टे देण्यात येईल व घरकुल उपलब्ध करून देण्यात येईल असेही ना.बावनकुळे यांनी म्हटले.यावेळी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ (किर्तीकुमार) भांगडिया,माजी खासदार डॉ.अशोक नेते यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे,माजी आमदार तथा पदवीधर मतदारसंघाचे प्रमुख सुधाकरजी कोहळे,ओबीसी समाजाचे नेते डॉ. अशोकजी जिवतोडे,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूरचे अध्यक्ष रवीजी शिंदे,भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष अनिलजी धानोरकर,गडचिरोली भाजपा जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे,माजी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे,माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, माजी जि.प. उपाध्यक्ष कृष्णा सहारे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रोहितभाऊ बोम्मावार,गणेश तर्वेकर,आवेश खा.पठाण,राज्य परिषद सदस्य राजूभाऊ देवतळे,लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे,जि.प. माजी बांधकाम सभापती संतोष तंगडपलीवार, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अविनाश पाल,भाजपा तालुकाध्यक्ष किशोरभाऊ वाकुडकर,महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा वंदना शेंडे,जिल्हा महामंत्री गीता हिंगे, भाजप नेते संजय गजपुरे, देवराव सा‌ मुदमवार, अर्जुन भोयर,दौलत भोयर नीलम सुरमवार,छाया चकबंडलवार, सतिश बोम्मावार,सचिन तंगडपलीवार, नितिन कारडे, आशिष कार्लेकर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक भाजपा तालुका अध्यक्ष किशोर वाकुळकर यांनी केले तर संचालन चंचल रोहनकर यांनी आभार पूनम झाडे यांनी मानले.

या भव्य कार्यकर्ता मेळावा व पक्ष प्रवेश सोहळ्याच्या यशासाठी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नेतृत्वाने अपार परिश्रम घेतले. संपूर्ण सावली परिसरात भाजपाचा झेंडा फडकत, घोषणांनी दुमदुमला,
आणि जनतेच्या उत्साहाने या कार्यक्रमाला यशस्वीतेचा नवा उत्साह संचारला.