दुचाकी स्वारास ट्रकने उडविले, सावली तालुक्यातील 2 युवक ठार तर 1 गंभीर जखमी

6167

फवारणी साठी औषध घेऊन येणाऱ्या दुचाकी स्वरास ट्रकने उडविल्याने सावली तालुक्यातील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे.या अपघाताचे वार्ता कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

 

सध्या शेतात कापूस धान पिकांवर औषधी फवारणीचे दिवस आहेत. करिता दोन युवक शेतकरी औषध खरेदी करून पोंभुर्णा येथून सावली तालुक्यातील पेंढरी मक्ता कडे दुचाकीने येत असतांना मूल तालुक्यातील जुनासूर्ला गावाच्या हद्दीत ट्रकने दुचाकी धारकांना धडक दिल्याने दोन युवकांचा मृत्यू झाला तर एक युवक गंभीर जखमी झाल्याने चंद्रपूरला उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

सावली तालुक्यातील पेंढरी मक्ता येथील युवक कापसाला फवारणीचे औषध खरेदी करून मोटरसायकलने गोंडपिपरी खेडी मार्गे येत असतांना पोलीस स्टेशन मुल अंतर्गत जुनासूर्ला गावाच्या हद्दीत ट्रकने दुचाकी स्वारकाना उडविले. ही घटना दुपारी २.३० च्या सुमारास घडली असून या अपघातात सारंग गंडाटे (वय २६) रा. पेंढरी मक्ता याचा जागीच मृत्यू झाला तर प्रियांशु गंडाटे (वय २३) रा. पेंढरी मक्ता याचा मुल उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. तर लंकेश समर्थ रा. मुंडाळा हा जखमी असून चंद्रपूरला उपचारासाठी हलविण्यात आले आहे. पुढील तपास मूल पोलिस करीत आहेत.