
विरखल चक (ईश्वर गंडाटे यांच्या कडून)
सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या व्याहड खुर्द उपवनक्षेत्रातील
विरखल चक या गावातील भास्कर मारभते यांच्या घरात अस्वल घुसून ठाण मांडून बसल्याने खळबळ माजली असून या घटनेची माहिती वनपरिक्षेत्र कार्यालय सावली यांना देणात आली. मारभते यांच्या घरात अस्वल घुसण्याची ही तिसरी वेळ आहे.मात्र काही वेळाने ती निघून जात होती आता मात्र चक्क ठाण मांडून बसल्याने आता रेस्क्यू मोहीम राबवून त्या अस्वल ला जेरबंद करण्याची मागणी करण्यात येत आहे.
अस्वल ही सतत गावात येत असल्याने शेतकऱ्यांना व गावकरी यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.








