
वैनगंगा नदीच्या पात्रात #MBBS चे 3 विद्यार्थी बुडाले !

सावली(सूरज बोम्मावार)
चंद्रपूर गडचिरोली #chandrpur-gadchiroli# सीमेवरील नदीच्या पुलाखाली वैनगंगा नदीच्या पात्रात आंघोळीसाठी गेलेल्या गडचिरोली येथील रुग्णालयातील आठ पैकी तीन शिकावू डॉक्टर हे बुडाल्याची माहिती प्राप्त झाली असून घटनेची माहिती मिळताच सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप पुलरवार हे आपल्या चमूसह घटनास्थळी पोहोचलेले आहेत.
सदर तीनही युवक हे गडचिरोली येथे MBBS चे प्रथम वर्गात शिक्षण घेत आहे. आज सुट्टी असल्याने हे सर्व जण नदीमध्ये अंघोळीसाठी गेले होते.यावेळी ऐकून 8 जण होते मात्र त्यापैकी गोपाळ गणेश साखरे,पार्थ बाळासाहेब जाधव,स्वप्नील उद्धवसिंग शिरे हे बुडाले असून या युवकांना काढण्यासाठीचे शर्तीचे प्रयत्न सुरू आपदा ग्रुप व पोलीस विभाग करीत आहे अधिक ची माहिती लवकरच…
यापूर्वी ही याच जागेवर चंद्रपूर येथील 3 बहिणींचा बुडून मृत्यू झालेला होता हे विशेष !