सहकार भारती १ लाख सभासद करणार- विवेक जुगादे राज्य महामंत्री यांचा निर्धार

सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणारी सहकार भारती राज्य कार्यकारिणी ची सभा दि.३ व ४ मे २०२५ ला रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी उत्तन मिरा भाईंदर मुंबई येथे संपन्न झाली. सभेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सहकार राज्यमंत्री पंकज भोयर यांचे शुभहस्ते, दत्ताराम चालके राज्याध्यक्ष सहकार भारती यांचे अध्यक्षतेखाली व नरेंद्र मेहता आमदार मिरा भाईंदर,विवेक जुगादे राज्य महामंत्री यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. ३ मे ला सकाळी ९ वाजता पहिल्या सत्राला सुरुवात झाली. भारतमाता व सहकार भारती चे संस्थापक स्व. लक्ष्मणराव इनामदार यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विवेक जुगादे यांनी केले.सहकारभारतीच्या प्रार्थनेने सत्रातील विषयाला सुरुवात करण्यात आली.संपूर्ण महाराष्ट्रात सहभारतीचे १ लाख सभासद करण्याचे आवाहन विवेक जुगादे यांनी प्रास्ताविकात केले.संघ शताब्दी व पंचपरिवर्तन या विषयावर सुमंतजी आमशेकर क्षेत्रीय प्रचारक यांनी विस्तृत माहिती दिली.संघटना व शासन समन्वय या विषयावर मुख्यमंत्री कार्यालयातील ओएसडी प्रथमेश घोलप यांनी सहकार क्षेत्राचे शासननिर्णय निर्गमित करतांना संघटना पदाधिकारी यांचेशी चर्चा करुन निर्णय घेतले जातात व सहकाराशी योग्य असे निर्णय घेण्यात येतात अशी सविस्तर माहिती दिली.त्यानंतर विभागनिहाय बैठका घेण्यात आले.

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त विभागाने केलेल्या कार्यक्रम व उपक्रमाचा आढावा घेण्यात आला. संघटना व विविध फेडरेशन समन्वय या विषयावर राज्य फेडरेशन चे अध्यक्ष व राज्य पतसंस्था फेडरेशन चे अध्यक्ष यांनी केंद्र व राज्य शासनाशी सुरु असलेल्या पाठपुरावा विषयी सखोल मार्गदर्शन केले. दुस-या सत्राचा शुभारंभ*सहकार से समृद्धी यही हमारा मंत्र है*’सहकार गीताने करण्यात आला.संघ शताब्दी व आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त प्रस्तावित कार्यक्रम या विषयावर वैशाली आवाडे व श्रीकांत पटवर्धन यांनी चर्चा करुन जिल्हा व विभाग निहाय उद्योग महोत्सव,स्पर्धा परीक्षा, सांस्कृतिक महोत्सव यांसारख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे असे मार्गदर्शनातून सांगितले . संघटना रचना, प्रवास व निधी संकलन या विषयावर शरद जाधव संघठन प्रमुख यांनी सहकार क्षेत्रातील बदलते स्वरुप व विविध योजनांची माहिती दिली व निधी संकलन साठी करावयाचे नियोजन याविषयी विस्तृत माहिती दिली. नियोजनबद्ध कार्यक्रम, सदस्यता अभियान अभ्यासवर्ग प्रशिक्षण वर्ग यासंबंधी सविस्तर माहिती प्रवीण बुलाख यांनी मुद्देसुद माहिती दिली.राज्य कार्यकारिणीत नवनियुक्त पदाधिकारी यांचा अध्यक्ष व महामंत्री यांचे शुभहस्ते सत्कार करण्यात आला.राजेंद्रजी गौतम राष्ट्रीय मंत्री यांनी समारोपीय मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता सहकार भारतीच्या संगठन मंत्रानी करण्यात आले.नाश्ता,चहा,भोजन व निवास व्यवस्था अतिशय नियोजनबद्ध व उत्तमरित्या करण्यात आली.

यावेळी सहकार भारती चे,नागपूर विभागहसहप्रमुख विजय गोटे,चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सतिश वासमवार,जिल्हा महामंत्री पुष्पाताई गोटे, सहसंघठन मंत्री राजेश कावडकर, महिला संघटन प्रमुख प्रगती माढई, भारती चवेले महिला सहसंघटनमंत्री तसेच गडचिरोली जिल्हा शेषराव येलेकर जिल्हाध्यक्ष,जिल्हा महामंत्री किशोर आनंदवार,संघटन प्रमुख मनीष फाये, सहसंघटन मंत्री अमोल आकरे,संध्या येलेकर महिला संघटन प्रमुख ,जीवन भोयर,संतोष गोटमुकुलवार,टारझन सुरजगडे,आशिष धात्रक,देवेंद्र लांजेवार उपस्थित होते.