
सावली ता. प्र.

व्याहाड बुज ग्रामपंचायतच्या वतीने श्री. सुनिल जी बोमनवार यांचा कृषी उत्पन्न बाजार समिती, सावली येथे ग्रामपंचायत गटातून नवनिर्वाचित संचालक पदी म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचे शाल श्रीफळ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी ग्रामपंचायत सरपंच सौ. कविता बोलीवार, उपसरपंच परशुराम भोयर,ग्रा.प. सदस्य दिवाकर गेडाम, जनार्दन गुरूनुले, हिंमत मोटघरे, प्रणिता तोडेवार, वैशाली निकेसर, संगीता जेंगठे तसेच सचिव भाऊराव मसराम,व कर्मचारी ओमकार बुक्कावार आणि करण करकाडे यांची उपस्थिती होती.
यावेळी सर्वांनी बोमनवार यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या..