
सावली : माजी राज्यमंञी, भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावलीचे संस्थापक अध्यक्ष तथा लोकनेते स्व. वामनरावजी गड्डमवार यांच्या जयंती निमित्य प्रगतशील शेतकरी तथा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आणि विद्यार्थी मार्गदर्शन मेळावा शुक्रवार दि. ६ सप्टेंबर २०२४ रोजी सावली येथील विश्वशांती विद्यालयाचे प्रांगणात आयोजित केला आहे.

भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावलीच्या वतीने आणि संस्थेव्दारा संचालित विद्यालय व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जयंती सोहळ्याचे उदघाटन माजी मंञी तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना. विजय वडेट्टीवार यांचे हस्ते होणार आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा राजुरा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या सोहळ्यात गडचिरोली चिमुर क्षेत्राचे खासदार डाँ. नामदेव किरसान आणि पदवीधर मतदार संघाचे आमदार अँड. अभिजीत वंजारी यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
यावेळी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नितेश कराळे गुरूजी उपस्थित राहणार आहेत.
आयोजित कार्यक्रमाला नागरीकांनी मोठ्या संख्येनी उपस्थित राहावे. अशी विनंती संस्थाध्यक्ष संदीप गड्डामवार आणि सचिव राजाबाळ संगीडवार यांनी केली आहे.