आत्ताची ब्रेकिंग न्यूज…..वीज पडून एक महिला ठार;एक गंभीर

16615

आत्ताची ब्रेकिंग न्यूज…..वीज पडून महिला ठार;एक महिला गंभीर

सावली तालुक्यातील केरोडा येथे शेतात काम करीत असताना वीज अंगावर पडल्याने चित्रकला सुधाकर भुरसे या शेतकरी मजूर महिलेचा मृत्यू झाला असून शालू भास्कर भुरसे ही महिला गंभीर जखमी झालेली आहे.

सदर घटना ही राहुल भंडारे यांच्या शेताजवळ घडलेली आहे सदर घटनेत महिला मृत्यूमुखी झाल्याचे लक्षात येताच जखमी महिलेला रुग्णालयात भरती करण्यासाठी करण्याची व्यवस्था करण्यात आली असून या संदर्भात सावली पोलिसांना व प्रशासनाला माहिती देण्यात आलेली आहे.

आज सावली शहरात दुपारपासून अचानक वातावरणात बदल होऊन विजेच्या कडकडाट सुरू झाल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे