चंद्रपूर-गडचिरोली मुख्यमार्गावर भीषण अपघातात 2 जण जागीच ठार;2 जण गंभीर जखमी

6468

चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर आज रात्रौ 7;30 च्या दरम्यान हिरापूर येथे  एका दुचाकी ला ट्रकने उडविल्याने त्यात 2 जण जागीच ठार तर 2 जण गंभीर जखमी आहे.मृतांमध्ये 3 वर्षाचा बालकाचा समावेश आहे तर दुसरा हा युवा आहे. मृतक हे गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील फराळा येथील असल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे.

 

अपघात झाल्या बरोबर या अपघाताची माहिती हिरापुर येथील सामजिक कार्यकर्ते रवी झरकर यांना मिळताच सावली पोलीसांना अपघाताची माहिती दिली व जखमींना सावली येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले आहे.शेवंता कावळे 65 वर्ष,नवेगाव, हरिदास बापुजी बोरुले 30वर्ष हे जखमी आहे.यात मयत बापु हरीदास बोडले 3 वर्ष आहे.

.पोलीस घटनास्थळी पंचनामा करीत असून नेमका अपघात कसा झाला याची माहिती हे वृत्त लिहे पर्यँत कळू शकली नाही.