
एस न्यूज नेटवर्क / सिंदेवाही

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सिंदेवाही येथील शाखेला आज पहाटेच्या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने लाखो रुपयाचे नुकसान झालेले आहे सदर घटना आज पहाटे उघडकीस येतात एकच खळबळ माजली.
त्यानंतर सदर घटनेची माहिती सिंदेवाही येथील पोलीस विभागांना व अग्निशामक दलाला देण्यात आली त्यानंतर अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचून सदर आग विझविण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले.या आगीमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून अनेक वस्तू जळून खाक झाले आहे.सदर घटनेचा तपास सुरू आहे.