
उन्हाळ्यात नागरिकांना पिण्याच्या थंड पाण्यासाठी सद्या वणवण लक्षात घेता मार्गावरील प्रवाशांना थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी सावली येथील नगरसेवक तथा गटनेता सतीश बोम्मावार यांनी पुढाकार घेत थंड पाण्याची पाणपोई चंद्रपूर-गडचिरोली मुख्य मार्गावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या बाजूला आज दिनांक 1 मे महाराष्ट्र दिनापासून सुरुवात केली.

या पाणपोई चे सावली न.पं. चे या प्रभागातील नगरसेवक तथा पाणी पुरवठा सभापती प्रीतम गेडाम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगरसेवक तथा गटनेता तथा भाजपा तालुका महामंत्री सतीश बोम्मावार,माजी नगरसेवक चंद्रकांत संतोषवार,युवा नेता गौरव संतोषवार, युवा नेता निखिल सुरमवार,वंचित बहुजन आघाडी चे शहराध्यक्ष रोशन बोरकर,भाजपा सावली शहराध्यक्ष आशिष कार्लेकर,महेंद्र थोरात, आशिष दुधे, अमोल दुधे,प्रसाद जक्कुलवार, आशिष संतोषवार,राहुल लोडेल्लीवार,पद्माकर डोंगरे,धर्मेश बोरकर,राजेश रापेलीवार,सौरभ गोहणे,भाग्यवान घोनमोडे, चक्रपाणी दुधे,रोशन डोहणे,अशोक दुर्गे,जोगेंद्र गोवर्धन,उत्तम कोसनकर आदी जण यावेळी उपस्थित होते.
यावेळी अनेकांनी नगरसेवक सतीश बोम्मावार यांच्या पाणपोई च्या कार्याला शुभेच्छा दिल्या.