
*बैलगाड़ीच्या दिंडीने नवविद्यार्थ्यांमध्ये आनंदाचा वातावरण*

सावली / सौरव गोहने
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, उसेगाव या शाळेच्या मुख्याध्यापक कोकाटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली काल दिनांक 27 एप्रिल 2024 रोजी प्रवेश शाळापूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला.
सर्वप्रथम शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमरदीप रामटेके व विलास मुस्सदिवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश शाळापूर्व तयारी मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.
मुख्याध्यापक कोकाटे यांच्या मार्गदर्शक सूचना अनुसार विविध सात टेबलावर विद्यार्थ्यांचे व पालकाचे मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थी प्रगती बाबत नोंदी घेण्यात आल्या. या मेळाव्याला पालकांनी व शाळा व्यवस्थापन समितीने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. इयत्ता पहिली मध्ये प्रवेश पात्र मुलांना शाळेत दाखल करून घेण्यात आले. गावात बैलगाड़ीने दिंडी काढून आनंदाचा वातावरण निर्मिती करण्यात आली. तसेच नवविद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. व विद्यार्थ्यांसाठी शाळेत आगळा वेगळा उपक्रम म्हणून नवविद्यार्थ्यांसाठी सेल्फी पॉइंटवर फोटो काढून नवविद्यार्थ्यांचा आनंद वाढवण्यात आला.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच शाळेतील मुख्याध्यापक कोकाटे सर शाळा व्य. स. अध्यक्ष अमरदीप रामटेके व विलास मुसद्दीवार , अं.सेविका चंद्रकला सहारे, तथा सर्व शिक्षकवृंद यांचे सहकार्य लाभले. यावेळी मोठ्याप्रमाणावर पालक व नागरिक उपस्थित होते.